Nagar | 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून अत्याचार

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील वाॅर्ड नंबर 1 मधील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचार करणारे हेही अल्पवयीन आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरातील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलास 9 अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला. या पीडित मुलाने सदरची घटना उशिराने त्याच्या आईला सांगितली. आईने तातडीने पोलीस स्टेशन गाठून सदरची घटना पोलिसांना सांगितली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या अल्पवयीन आरोपी विरुध्द पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील 9 जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अत्याचार प्रकरणी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 11 वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गांभीर्यता समोर आली आहे.





