Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शिंदेंच्या शिवसेनेचा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा, महायुतीत खळबळ
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेत 'अभय योजने'तील कथित भ्रष्टाचारावरून सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत अभय योजनेतील कथित गैरप्रकारांवरून सत्ताधारी गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अभय योजनेच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप करत शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Maharashtra Politics)
‘अभय योजने’च्या नावाखाली पैशांची मागणी?
नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी अभय योजना लागू करण्यात आली होती. मात्र, या योजनेच्या नावाखाली काही अधिकारी नागरिकांकडून मोठ्या रकमेची मागणी करत असल्याचा आरोप अमेय घोले यांनी केला. “कॉलनी ऑफिसर लोकांकडून पाच-पाच लाख रुपये मागत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही,” असा दावा घोले यांनी बैठकीत केला. (Maharashtra Politics)
एका फाईलमागे पाच ते दहा लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. (Maharashtra Politics)
‘सत्तेवर लाथ मारू, पण अन्याय सहन करणार नाही’
या प्रकरणावरून घोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सभात्याग करू, सत्तेवर लाथ मारू; पण अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन गरिबांना न्याय मिळेपर्यंत या बैठकीचा भाग होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Maharashtra Politics)
त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे मुंबई महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा म्हणून पाहिले जात आहे. मात्र, घोले यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सवाल
अभय योजनेतील कथित गैरप्रकारांवरून घोले यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याचे आरोप समोर येत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. शिवसैनिक अन्याय सहन करणार नाहीत, अशी भूमिका घेत त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)
सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
दरम्यान, महापालिकेतील सुधार समितीच्या बैठकीबाबतही घोले यांना विचारण्यात आले. संबंधित विषय मराठी कुटुंबांच्या इमारतीशी संबंधित असल्याचे सांगत, आपण त्या बैठकीचा भाग नसल्याने याबाबत अधिक माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
अभय योजनेतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांमुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आता या आरोपांची प्रशासनाकडून कशी दखल घेतली जाते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






