Pune News : संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला; डीजेला विरोध केल्याने विद्यानंद बापट यांच्यावर केला होता हल्ला
Pune News : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडल्याच्या रागातून वृत्तवाहिनीला मुलाखत देणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पुणे न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

Pune News : डीजे विरोधी भूमिकेमुळे वृत्तवाहिनीला मुलाखत देणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात सहायक सरकारी अभियोक्ता अमर ननावरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. (Pune News)
तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीला सोडणे समाजासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात दंगल, हाणामारी आणि घरफोडीचे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचा अहवाल ॲड. ननावरे यांनी पुराव्यानिशी न्यायालयात सादर केला. (Pune News)
गणेशोत्सवाच्या काळात डीजेला विरोध करणाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला करणे हे समाजात द्वेष निर्माण करणारे असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. (Pune News)
तसेच, सर्वौच्च न्यायालयाच्या ‘जगजीत सिंग विरुद्ध आशिष मिश्रा’ या निकालानुसार फिर्यादी बापट यांचे ऐकून घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार केल्याशिवाय जामीन मंजूर करणे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन ठरेल, असा युक्तीवाद ॲड. ननावरे यांनी केला. (Pune News)
त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला. ३ सप्टेंबर रोजी सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावर घडलेल्या घटनेबाबत विद्यानंद सुहास बापट (वय ३७, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. (Pune News)
बापट हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आरोपीने त्यांचा रस्ता अडवला. ‘तू आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करतो का, डीजेच्या विरोधात बोलतो का,’ असे म्हणत आरोपीने त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune News)
Pune News : ५ लाखांची लाच घेताना पोलिस हवालादराला रंगेहाथ पकडले; ACB ची धडक कारवाई





