Harshwardhan Sapkal : फडणवीस हे इन्फ्रा मॅन नव्हे, डिझास्टर मॅन; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई परिसरात पावसामुळे झालेले १२ मृत्यू हे नैसर्गिक संकट नसून, प्रशासकीय अपयश आणि मानवनिर्मित आपत्तीचा परिणाम आहेत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सोमवारी राज्य सरकारवर केला.

Harshwardhan Sapkal : मुंबई परिसरात पावसामुळे झालेले १२ मृत्यू हे नैसर्गिक संकट नसून, प्रशासकीय अपयश आणि मानवनिर्मित आपत्तीचा परिणाम आहेत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सोमवारी राज्य सरकारवर केला.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रा मॅन न म्हणता डिझास्टर मॅन असे म्हटले. पावसाळ्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची तयारी अपुरी होती, अशी टीका केली.
सपकाळ यांनी ७,१८१ कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरही टीका केली. या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि संरचनात्मक त्रुटी होत्या आणि उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तो बंद करावा लागला, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात तज्ज्ञांनी बोगद्याच्या सुरक्षिततेपासून ते लोणावळा धरणाजवळील भूगर्भीय स्थिरतेपर्यंत १३ विशिष्ट आक्षेप नोंदवले होते, परंतु सध्याच्या सरकारने घाईघाईने उद्घाटन करण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले आणि सार्वजनिक सुरक्षा व करदात्यांच्या पैशांशी तडजोड केली.
फडणवीस यांना इन्फ्रा मॅन नव्हे तर डिझास्टर मॅन म्हणत, त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हा प्रकल्प अजूनही चाचणीच्या टप्प्यावर असल्याचे म्हटल्याने त्यांनी फडणवीस याच्यांवर टीका केली.
२०१४ पासून सत्तेत असलेला भाजपही या सर्व वर्षांत चाचणीच्या टप्प्यावरच होता का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकार मिसिंग लिंक प्रकल्पातील भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी (Harshwardhan Sapkal) केला.






