Shiv Sena : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कोणाचे? आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shiv Sena : शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे अधिकृत अस्तित्व, धनुष्यबाण चिन्ह आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी झाली.

Shiv Sena : शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे अधिकृत अस्तित्व, धनुष्यबाण चिन्ह आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात संपूर्ण घटनाक्रम मांडत शिंदे गटाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी २ वाजता होणार आहे. (Shiv Sena)
ठाकरे गटाचा काय दावा?
कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले की, शिवसेना हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून पक्षाची घटना आणि पक्षप्रमुखांचे अधिकार याबाबत कधीही वाद नव्हता. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेते आणि सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. २०२२ मध्ये काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर बंडखोर आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती केली, असा घटनाक्रम सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडला. (Shiv Sena)
त्यांनी असा युक्तिवादही केला की, विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्षाचे बहुमत होत नाही. पक्षाच्या घटनेनुसार गटनेते आणि प्रतोद बदलण्याचे अधिकार केवळ पक्षप्रमुखांकडेच असतात. त्यामुळे बंडखोर आमदारांनी केलेले निर्णय आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. (Shiv Sena)
न्यायालयात महत्त्वाचे प्रश्न
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांनी निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग चिन्ह हे राजकीय पक्षालाच देतो, त्यामुळे चिन्हावर दावा हा मूळ पक्षाचाच असतो, असे स्पष्ट केले. (Shiv Sena)
सरन्यायाधीशांनीही पक्षातील “बहुमत” कसे निश्चित करायचे, याबाबत स्पष्ट निकष आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर सिब्बल यांनी पक्षाची घटनाच त्याचे उत्तर देते, असा युक्तिवाद केला. (Shiv Sena)
बंडखोरांवर गंभीर आरोप
कपिल सिब्बल यांनी बंडखोर आमदारांनी भाजपच्या संपर्कात राहून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली केल्याचा आरोप केला. सरकार पाडून मुख्यमंत्रीपद मिळवणे हेच या संपूर्ण घडामोडीमागचे उद्दिष्ट होते, असा दावा त्यांनी न्यायालयात केला. तसेच, पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणे, पक्षप्रमुखांचे आदेश न पाळणे आणि स्वतःचे गटनेते व प्रतोद घोषित करणे, या सर्व कृती पक्षत्यागाच्या स्वरूपाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. (Shiv Sena)
उद्याच्या सुनावणीकडे लक्ष
बुधवारचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या संवेदनशील प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दुपारी २ वाजता होणार आहे. शिवसेना पक्षाचे अधिकृत अस्तित्व, धनुष्यबाण चिन्हाचा दावा आणि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena)
Shiv Sena Leader : मोठी बातमी..! शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ
Shiv Sena (UBT) : ठाकरे गटाची बैठक; एका आमदाराची दांडी चर्चेत, उद्धव ठाकरेंचं महत्वाचे आवाहन






