Pune News : श्री शारदा गजानन आडते असोसिएशनचा विस्तार; २२ संचालक नियुक्त
Pune News : पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि केळी बाजारातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या 'श्री शारदा गजानन आडते असोसिएशन' चा मोठा विस्तार करण्यात आला आहे.

Pune News : मार्केट यार्डाती फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि केळी बाजारातील श्री शारदा गजानन आडते असोसिएशन संघटनेचा विस्तार झाला आहे. उपाध्यक्ष पदी युवराज काची, सचिव पदी राहुल कोंढरे आणि खजिनदार पदी दिलीप भालेराव यांची निवड झाली आहे. या पदाधिकाऱ्यंसह आता एकुण २२ संचालक असणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल घुले यांनी दिली. (Pune News)
यावेळी संघटनेचे प्रवर्तक तथा बाजार समितीचे संचालक गणेश घुले आणि मुख्य मार्गदर्शक बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ उपस्थित होते. मे महिन्यात ही संघटना स्थापन झाल्यापासून बाजार आवारातील आडतदारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहे. संघटनेच्या स्थापनेच्या वेळी ७ संचालक होते. आता संघटनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे संचालकांची संख्या वाढवून अध्यक्षांसह २३ करण्यात आली आहे. (Pune News)
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अमोल मुरलीधर घुले
तरकारी विभाग
नंदकुमार गावडे, बापूसाहेब काळभोर, निखिल भुजबळ, गौरव मोडक, युवराज मुजुमले, रमेश बडदे, गिरीश शेंडकर, सुरेश पांगारे, रितेश पोमण, दादासाहेब लाटे, जितू महाजन, महेश बेंद्रे
केळी विभाग
गणेश ऊर्फ राहुल कोंढरे (सचिव)
पान बाजार विभाग
सिद्धार्थ गायकवाड
फळ विभाग
युवराज काची (उपाध्यक्ष)
अजित घुले
नितीन कुंजीर
ज्ञानेश्वर ढमाले
कांदा-बटाटा विभाग
दिलीप भालेराव (खजिनदार)
संजय भोंडवे
पराग म्हेत्रे
भरत गिरे
ही संघटना व्यापाऱ्यांच्या हिताबरोबरच संपूर्ण बाजार आवाराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक विभागातील आडतदार बांधवांना योग्य न्याय, प्रतिनिधित्व आणि सक्षम नेतृत्व मिळावे, या उद्देशाने संचालक मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.
अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन





