Pune News :’MH 12′ चं पुण्याची ओळख कायम राहणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची माहिती
Pune News : पुणे आरटीओमध्ये वाहनांच्या नवीन नोंदणीसाठी सध्या 'MH 12 ZZ' ही या मालिकेतील शेवटची मालिका सुरू आहे.

Pune News : पुणे आरटीओमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या MH 12 ZZ ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा MH 12 हा आरटीओ कोड बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune News)
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, पुण्याची ओळख असलेला MH 12 हा कोड कोणत्याही परिस्थितीत बदलू नये आणि त्याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंती केली. (Pune News)
याबाबत नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुरलीधर मोहळ यांनी म्हटले आहे. MH 12 हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याचा दावा मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. (Pune News)
यामुळे पुण्याची ओळख मानला जाणारा MH 12 हा वाहन नोंदणी कोड कायम राहण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मोहळ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. (Pune News)






