Shiv Sena Leader : मोठी बातमी..! शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ
Shiv Sena Leader : शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाने अकोल्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Shiv Sena Leader : अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यूप्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा आरोप करत पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर थेट हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Shiv Sena Leader)
माहितीनुसार, 23 जुलै रोजी सायंकाळी अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शेख मोहसीन यांच्या दुचाकीला मागून भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रात्री त्यांचा मृत्यू झाला. (Shiv Sena Leader)
मात्र, मृतकाच्या कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, मंगेश काळे यांनीच वाहनाने धडक देत शेख मोहसीन यांची हत्या केली. या आरोपांमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, मंगेश काळे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Shiv Sena Leader)
मंगेश काळे हे शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या सध्या महापालिकेत नगरसेविका आहेत. घटनेनंतर संतप्त नातेवाईक, समर्थक आणि नागरिकांनी खदान पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (Shiv Sena Leader)
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हा अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. कुटुंबीयांनी केलेले आरोप सध्या तपासाचा भाग असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे. (Shiv Sena Leader)
Shiv Sena Leader : मोठी बातमी..! शिवसेनेच्या बड्या नेत्यावर कोयत्याने हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
Shiv Sena leader Arrest : राजकीय वर्तुळात खळबळ ! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याला अटक






