Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार काल बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्या. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पक्षातील कोणताही ज्येष्ठ नेता नसून, त्या एकट्याच दिल्ली दौऱ्यावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांना भेटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे असणार आहे. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. आता संजय राऊत यांनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात बाबत विधान केलं. मात्र राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे भाजपमध्ये होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. Sanjay Raut भविष्यात २५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल, असं संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “मी वारंवार हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि सुनेत्रा ताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा ताई पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं, कोणती पद दिलं हा त्यांचा विषय आहे,” असे खासदार संजय राऊत म्हणाले. Maharashtra Politics Sunetra Pawar : दिल्लीकडे महाराष्ट्राचं लक्ष; NCP मध्ये सत्तासंघर्ष? सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, नेमकं काय घडतयं? दोन्ही पक्षातील एकूण 50 आमदार भाजपात “परंतु भविष्यात या पक्षातील 25-30 आमदारांसह हा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे मी आताच तुम्हाला सांगत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील तितकेच आमदार, म्हणजे 25 -25 आमदार हे भाजपमध्ये जातील. हे आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा ताईंचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावं लागेल,” असा दावा राऊतांनी केला आहे. याचवेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि निशाणी कुणाची यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकल्यावर नाराजी व्यक्त केली. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली हेही वाचा : Stock Market : शेअर बाजारात खळबळ ! सेन्सेक्स १४१७ अंकांनी कोसळला ; निफ्टीही लाल रंगात