Tanaji Sawant Meet Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि परंडा विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना तातडीने बोलावून घेतले होते. त्यानंतर तानाजी सावंत देखील मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली. शिंदे यांच्या भेटीसोबतचे फोटो स्वत: तानाजी सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. शिंदे आणि सावंत यांच्या भेटीनंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज आहेत. त्याचवेळी त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तातडीने तानाजी सावंत यांना बोलवण्यामागे नेमकं काय कारण आहे? असाही सवाल केला जात आहे. राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा मात्र, या भेटीदरम्यान राज्याच्या विकासाचे विविध मुद्दे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे या आधी राज्य सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही त्यांनी भाग घेतला नाही. Tanaji Sawant Meet Eknath Shinde | शिंदे गटाला मोठा धक्का शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडल्यामुळे धाराशिवमध्ये शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतल्याने या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. Tanaji Sawant Meet Eknath Shinde | हेही वाचा: गणेशभक्तांना घेऊन जाणारी खासगी बस जळून खाक; रत्नागिरी-कशेडी बोगद्याजवळील घटना