Pune News : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या कारवर गोळीबार; दुचाकीवरून आले अन्.. नेमकं काय घडलं मध्यरात्री?
Updated On:

Firing on Yuva Sena vehicle : पुण्यातील वारजे माळवाडी भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेनेच्या युवासेना (शिंदे) जिल्हाप्रमुखाच्या वाहनावार गोळीबार करण्यात आला आहे. निलेश राजेंद्र घारे असे जिल्हाप्रमुखाचे नाव असून, सोमवारी मध्यरात्री त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबाराच्या हल्ल्यात निलेश घारे यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं मध्यरात्री काय घडलं?
निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर त्यांच्या कारच्या मागच्या दरवाजाच्या काचेवर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करत आहेत. निलेश घारे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख आहेत.





