शिल्पा शेट्टीने तंबाखू खाणाऱ्या पापाराझीला सुनावले

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासह तिच्या फिटनेसमुळे देखील ओळखली जाते. तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. सध्या ती ‘सुपर डान्सर ५’ या डान्स रिअॅलिटी शोद्वारे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यात ती जजच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या तिचा या शोच्या शूटिंगपूर्वीचा सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शूटिंगसाठी आत जाण्यापूर्वी, शिल्पा पापाराझींसमोर पोज देते आणि त्यांच्याशी बोलते. मात्र त्यापैकी एकाला ती ओरडताना दिसते. तिथे जमलेल्या पापाराझींपैकी एकाच्या तोंडात तंबाखू असल्याचं तिला दिसतं. तेव्हा ती त्याला हसत हसत पण स्पष्टपणे म्हणते, “तू इथे ये, मला तुझं तोंड बघायचंय…” पापाराझी त्याचे तोंड त्याच्या हातांनी झाकतो आणि शिल्पाला सांगतो की त्याने आता ते खाणे बंद केले आहे. ती पुढे म्हणते, “तंबाखू खाणं बंद कर.” ते ऐकून त्याचे मित्र त्याची चेष्टा करतात. Shilpa Shetty |
View this post on Instagram
शिल्पा कायमच शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला चाहत्यांना देत असते. असेच तिने आरोग्यासाठी घातक असलेलया पदार्थाचे सेवन न करण्याचा सल्ला पापाराझीला देखील दिला आहे. Shilpa Shetty |
‘सुपर डान्सर 5’ हा शो 19 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी टीव्हीवर शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता हा शो पाहता येणार आहे. शिल्पा शेट्टी लवकरच ‘केडी – द डेव्हिल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 4 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यात तिच्याबरोबर ध्रुव सरजा, संजय दत्त, नोरा फतेही, रेश्मा नानैया, व्ही रविचंद्रन आणि रमेश अरविंद हे कलाकार आहेत. Shilpa Shetty |
हेही वाचा:
“मशिदींमध्ये अजानही मराठीतून करा”; मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य, ओवेसी म्हणाले…





