Neha Dhupia : “हे सगळं बंद करा,” नेहा धुपिया पापाराझींवर भडकली
Neha Dhupia : 'माझेच नाही, तर इतर कोणाचेही असे फोटो काढायचे नाही'

Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) नुकतेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. मात्र यावेळी तिने पापाराझींना चांगलेच सुनावले आहे.
त्यांचं झालं असं की, नेहा मुंबईतील एका भव्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पोहोचली होती. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा ती बाहेर पडत होती, तेव्हा काही फोटोग्राफर्स मागून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागले. हे पाहताच नेहाचा पारा चढला आणि तिने लगेचच फोटोग्राफर्सना त्यांच्या या पद्धतीवर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेहा म्हणते, “हा कसला उद्धटपणा आहे, मागून (Back Shot) फोटो घेतला जात आहे. कोण घेतोय? हे सगळं बंद करा. माझेच नाही, तर इतर कोणाचेही असे फोटो काढायचे नाहीत. आम्ही सगळे सांगून सांगून थकलो आहोत. (Neha Dhupia)
Paps harassment is getting worst
day by day.Neha Dhupia slammed the paparazzi for taking inappropriate pictures from behind.
“Ye piche se kon photo leta hai, kuch to sram kro. Aisa mat kro kisi ke bhi sath”
Yesterday Sonakshi Sinha also scolded the paps for the same thing.… pic.twitter.com/fcztPoSh6b
— Mr SP (@Lonely_prabh) July 1, 2026
कधी बॅग समोर पकडून, कधी पुस्तक आडवे धरून, तर कधी उलटे चालून आम्हाला स्वतःचा बचाव करावा लागतो. हे सर्व आता चालणार नाही. हे लगेच बंद करा. आम्ही तुमच्याशी खूप आदराने बोलतो, त्यामुळे तुम्हीही असे वागू नका.”
नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिच्या या भूमिकेला सर्वांचं पाठिंबा दिला आहे. नेहाप्रमाणे याआधी देखील या मुद्यावरुन अनेक अभिनेत्रींनी पापाराझींना खडेबोल सुनावले होते. (Neha Dhupia)
दरम्यान, सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून परस्पर आदराचे एक घट्ट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे कॅमेरामनने देखील फोटो काढताना थोडी संवेदनशीलता आणि मर्यादा पाळली पाहिजे, याची नेहाने करून दिली आहे.
हेही वाचा:





