Mouni Roy : ‘बंद करा..!’ मौनी रॉय पापाराझींवर संतापली
Mouni Roy :

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळाले. एका रेस्टॉरंटमधून मौनी रॉय आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत बाहेर पडली होती, जिथे तिला अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मौनी रॉय तिच्या गाडीत बसताना दिसत आहे. ती कारमध्ये बसल्यानंतरही फोटोग्राफर्स सातत्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. सततच्या फोटोग्राफी आणि वीडियोग्राफीमुळे अभिनेत्री चांगलीच चिडलेली दिसली.
मौनी रॉयने पापाराझींना वारंवार थांबायला सांगितले. पण, जेव्हा ते ऐकले नाहीत, तेव्हा तिने कडक शब्दात सुनावले, “बंद करा!” मौनी चिडलेली आहे हे स्पष्ट दिसतं. यानंतर अनुषा दांडेकर परिस्थिती सांभाळण्यासाठी येते. ती पापाराझींना थांबण्याचा इशारा करते.
View this post on Instagram
दरम्यान, मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत विभक्त झाली. यानंतर मौनीने माध्यमांसमोर येणं टाळलं. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर मौनी कान्सला गेली होती. तेव्हाही जाताना मुंबई विमानतळावर तिने पापाराझींकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं होतं.
मौनी रॉयने अनेक वर्षे डेट केल्यानंतर २७ जानेवारी २०२२ रोजी सुरजशी लग्न केले होते. त्यांचे लग्न मल्याळी आणि बंगाली अशा दोन्ही परंपरांनुसार पार पडले होते. मात्र १४ मे रोजी मौनीने सुरजसोबत एक जॉइंट पोस्ट शेअर करत ते विभक्त होत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा:





