WPL 2026 Auction : एअरफोर्सच्या विंग कमांडरचा ऑक्शनमध्ये जलवा! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली

बेस प्राइसपेक्षा सहापट अधिकची लागली बोली –
शिखा पांडेची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. ऑक्शनमध्ये तिचे नाव येताच, आरसीबी आणि यूपी वॉरियर्सने तिला विकत घेण्यासाठी मोठी बोली लावली. आरसीबीने २.२ कोटी रुपयांपर्यंत बोली लावत शिखाला मिळवण्याचा प्रयत्न केला, पण यूपी वॉरियर्सने २.४ कोटी रुपये मोजून तिला आपल्या ताफ्यात सामील केले.
शिखा पांडे: क्रिकेटपटू आणि एअरफोर्स अधिकारी –
Shikha Pandey goes to UP Warriorz for ₹2.4 crore! A massive signing for the squad. 💛🔥#ShikhaPandey #UPWarriorz #WPLAuction #WPL2026 #WomensCricket #CricketUpdates pic.twitter.com/OPIVkIHTFE
— Cricadium (@Cricadium) November 27, 2025
शिखा पांडे केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर ती देशाच्या वायुसेनेतील एक अधिकारी देखील आहे. तिने गोवा इंजिनीअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केले आणि २०११ मध्ये भारतीय वायुसेनेत ‘कमिशन’ मिळवले. ती सध्या विंग कमांडर आहे आणि हैदराबाद तसेच जोधपूर येथे तिची नेमणूक असते.
शिखा पांडेचा जन्म १२ मे १९८९ रोजी आंध्र प्रदेशात झाला, पण तिचे शिक्षण गोव्यात झाले. तिचे बालपण गरिबीत गेले; कारण वडील छोटे व्यापारी होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. पण क्रिकेटची आवड असल्याने ती प्लास्टिकच्या चेंडूंनी सराव करत असत आणि दररोज ४० कि.मी. सायकल चालवून सरावासाठी जात असत.
अनुभव आणि शिस्त –
३६ वर्षीय शिखा पांडेचा अनुभव आणि शिस्त तिला डब्ल्यूपीएलमध्ये एक ‘हाई रेटेड’ खेळाडू बनवते. तिने ६२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहेत आणि तिचा इकॉनॉमी रेट केवळ ६.४ धावा प्रति षटक आहे. डब्ल्यूपीएलमध्ये तिने २७ सामन्यांमध्ये ३० विकेट्स घेतल्या आहेत आणि तिचा इकॉनॉमी रेट ७ धावा प्रति षटकपेक्षा कमी आहे. शिखा पांडेचा हा अनुभव आणि मैदानावरील अनुशासनच तिला इतकी महागडी बोली मिळवून देण्यात यशस्वी ठरले.





