सोलापुर : सोलापूरात महाविकास आघाडीमध्ये जागावाटप होताच राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सोलापुरात राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा, माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्यासह पक्षाने इतर पाच नवीन चेहर्यांना संधी दिली आहे. या पहिल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ड मधून राकेश मनोहर सोनी, प्रभाग क्रमांक 8 अ मधून मोहम्मद नकीब हासीब कुरेशी, प्रभाग क्रमांक 17 क मधून बिस्मिल्ला शिकलकर, प्रभाग क्रमांक 23 अ मधून सुनिता दादाराव रोटे, प्रभाग क्रमांक 26 अ मधून नागिणी प्रवीण इरकशेट्टी आणि प्रभाग क्रमांक 18 क मधून अंबादास सोमण्णा नडगीरे यांना राष्ट्रवादीकडुन उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापुरात शिवसेना-राष्ट्रवादीची युती रविवारी एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत महापालिकेसाठी युती करण्याचे घोषित केले. शिंदेसेना व अजित पवार पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा रविवारी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत केली. यावेळी दोन्ही पक्षांकडून महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठा भाऊ छोटा भाऊ असा भेदभाव न करता दोन्ही पक्षांनी निम्या जागा वाटून घेण्याचा निर्णय घेतला आहे.