शरद पवारांची डिनर डिप्लोमसी; राहुल-प्रियांका गांधींपासून कोणी कोणी लावली हजेरी ?; PM मोदींनी दिल्या खास शुभेच्छा वाचा…

New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज १२ डिसेंबर रोजी 84 वा वाढदिवस असल्याने काल रात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहभोजनासाठी हजेरी लावली होती. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. तसेच राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. राज्यासह देशातील अनेक महत्वाचे नेते देखील या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित होते. त्यामुळे दिल्लीतील शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
त्याचसोबत उद्योगपती गौतम अदानी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह हे खास पाहुणे देखील शरद पवार यांच्या निवासस्थान हजर होते. याशिवाय प्रमुख पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण स्विकारून शरद पवार यांच्या भेटीसाठी निवासस्थानी हजेरी लावली होती. यामध्ये भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसह इतर राजकीय पक्षांचे नेते होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शक्कले झाली असली तरी पवार कुटुंबाच्या एकजुटीचे पुन्हा दर्शन झाले. या वाढदिवसाच्या भेटीमुळे राष्ट्रवादीतील एकीकरणाच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या असून, पवार कुटुंबीयांच्या एकजुटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ जून 2026 मध्ये संपणार असल्याने हे हिवाळी अधिवेशन त्यांच्यासाठी शेवटचे ठरू शकते. मात्र, महाविकास आघाडी आणि अजित पवार गटाच्या पाठिंब्यावर त्यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्याची शक्यता आहे, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.
कोणी कोणी हजेरी लावली ? त्यांची यादी वाचा….
- गौतम अदानी
- अजित पवार
- प्रफुल्ल पटेल
- जयवीर शेरगिल
- कनिमोळी, डीएमके
- रवनीत सिंग बिट्टू, भाजप
- डेरेक ओ ब्रायन, तृणमुल
- गौरव गोगोई, लोकसभा उपनेते काँग्रेस
- अनिल देसाई , शिवसेना ठाकरे
- गुलाम नबी आझाद
- प्रतिभा अडवाणी, ( लालकृष्ण अडवाणींची कन्या )
- मणिक्कम टागोर , काँग्रेस
- शहानवाज हुसेन , भाजप
- डी. पुरंदेश्वरी , भाजप
- विप्लव देव , माजी मुख्यमंत्री भाजप त्रिपुरा
- पी चिदंबरम , काँग्रेस
- ओमर अब्दुला सहकुटुंब
- अनुप धोत्रे भाजप खासदार ( सहकुटुंब)
- दिग्विजय सिंग , माजी मुख्यमंत्री काँग्रेस
- कमलनाथ , माजी मुख्यमंत्री काँग्रेस
- बैजयंत पांडा , भाजप खासदार
- सचिन पायलट, काँग्रेस
- राहुल गांधी
- प्रियांका गांधी
- पार्थ पवार
- मिलिंद देवरा, शिवसेना खासदार
- श्रीकांत शिंदे
- निशिकांत दुबे भाजप खासदार
- धैयशील माने शिवसेना खासदार
- राजीव शुक्ला
- नवीन जिंदाल, भाजप
- जया बच्चन
- दिग्विजय सिंह
- मुकुल रोहतगी , सर्वोच्च न्यायालय वकील
- कपिल सिब्बल , वकील , सर्वोच्च न्यायालय
- शक्तीसिंह गोहिल, राज्यसभा , काँग्रेस
- रणदीपसिंह सुरजेवाला , राज्यसभा काँग्रेस
- पवन खेडा, राष्ट्रीय प्रवक्ता काँग्रेस
- प्रवेश वर्मा , भाजप दिल्ली जल मंत्री
- राघव चड्डा, आम आदमी पक्ष
- सागरिका घोष, टीएमसी खासदार
- रेवंथ रेड्डी
हेही वाचा : मावळ तालुक्यातील धरण परिसरातील शेतकऱ्यांवरील कारवाई थांबवा; आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे मागणी





