Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावली; बारामतीतून पुण्याच्या दिशेने रवाना

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. बारामतीतील निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते पुणे शहराच्या दिशेने निघाले आहेत.
श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना तपासणीसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने सकाळपासूनच गोविंदबागेत त्यांची तपासणी केली.
तासभर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल या खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.
अजित पवार यांच्या निधनांतर त्यांनी सलग काही दिवस अनेक लोकांच्या भेटी घेतल्या आणि राज्यभरातून येणाऱ्या नेतेमंडळी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सततच्या भेटीगाठी आणि दगदगीमुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवू लागल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होतील.
Gold & Silver Price: चांदीने मारली मोठी उडी ! १३००० रुपयांनी महागली ; सोनेही ३००० रुपयांनी वधारले






