Municipal Commissioner’s: पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकान कायमचे बंद
Municipal Commissioner's:

महापालिका आयुक्तांचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
Municipal Commissioner’s: अतिक्रमण हटविलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकान, आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. याशिवाय गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला आहे. तसा व्हिडिओ त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमणांविरोधात एकत्रित कारवाईला सुरुवात केली आहे. फ्रंट आणि साइड मार्जिनवरील अतिक्रमणे काढली असून, रविवारी सुमारे दोन लाख चौ. फूट क्षेत्र मोकळे केले आहे. फ्रंट आणि साइड हे नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी असतात, त्याचा खासगी वापर करता येणार नाही. त्यामुळे या कारवाईला सहकार्य करावे, अशी विनंती नवलकिशोर राम यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
ज्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई झाली आहे, तेथे लगेचच पुन्हा अतिक्रमण झाल्याचे काही ठिकाणी आढळले आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण केले, तर संबंधित दुकान, आस्थापना, व्यवसाय सील करून, कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
याशिवाय संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल करणार असल्याचे, आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई नागरिकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आहे, त्यामुळे सहकार्य करा, असे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे.





