पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे ‘अमिताभ बच्चन’ आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड आज एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याबाबत हे उद्गगार काढले.
‘वयाची 75 वर्षे उलटून गेल्यावरही ते ज्या उत्साहाने काम करत आहेत त्याची सगळ्याच तरुणाईला भुरळ पडली आहे. पवार हे प्रचंड ऊर्जा आणि ताकद असलेले नेते आहेत’. असे देखील यावेळी आव्हाड म्हणाले.
दरम्यान, याचवेळी पत्रकारांनी शिवसेना आणि भाजपाबाबत प्रश्न विचारला असता शिवसेनेला 100 जागा दिल्या तरीही ते युती करतील अन्य़था पक्ष फुटेल अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली.