WCL 2025 मध्ये भारताचा अभिमानी पवित्रा: स्टेडियम सोडत आफ्रिदीला दिलं सणसणीत प्रत्युत्तर, पाहा VIDEO

WCL 2025 India Champions and Shahid Afridi Video Viral : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील राजकीय संबंध तणावपूर्ण झाले असताना, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या सेमीफायनलमध्ये भारत चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास ठाम नकार दिला. युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्टेडियममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी अवाक् झाला.
लीग टप्प्यातही भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. तरीही सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना होणार असल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, भारतीय चॅम्पियन्सने आपला निर्णय स्पष्ट करताना पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा पवित्रा कायम ठेवला. सामना निश्चित झाल्यानंतर भारतीय संघाने स्टेडियममधून बाहेर पडत आपला संदेश स्पष्टपणे दिला.
Indian team packing their bags and knocked out out of WCL 🇮🇳
Lala watching them from the balcony. #WCL2025 pic.twitter.com/zpmffXfqWE— TEAM AFRIDI (@TEAM_AFRIDI) July 30, 2025
शाहिद आफ्रिदी आणि इंडिया चॅम्पियन्सचा व्हिडीओ व्हायरल –
بھارت سیمی فائنل تک تو پہنچ گیا اب کس منہ سے ھمارے ساتھ کھیلے گا۔شاھد آفریدی pic.twitter.com/1UScfnzpYl
— Shahid Khan Afridi Fan (@Afridiifan) July 30, 2025
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदी स्टेडियमच्या बाल्कनीतून युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन आणि इतर भारतीय खेळाडूंना स्टेडियममधून बाहेर जाताना पाहत आहे. सेमीफायनलपूर्वी आफ्रिदीने भडकाऊ वक्तव्य केलं होतं, “आता कोणत्या तोंडाने आमच्याविरुद्ध खेळतील?” पण भारतीय संघाने त्याच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – IND vs ENG : २१व्या शतकातील दुसरीच घटना: गिलचा नकोसा विक्रम, कोहलीच्या ‘या’ क्लबमध्ये झाला सामील
शाहिद आफ्रिदीचा अपेक्षा भंग –
Bro standing tall like a lion, watching the Indian team walk away like cowards.
Unreal AURA! 🔥 #WCL2025 pic.twitter.com/8iPat9eQSO— TEAM AFRIDI (@TEAM_AFRIDI) July 30, 2025
आफ्रिदीला वाटलं होतं की सेमीफायनल हा नॉकआउट सामना असल्याने भारताला त्यांच्याविरुद्ध खेळावंच लागेल. मात्र, भारतीय चॅम्पियन्सने अभिमानाने टूर्नामेंटमधून बाहेर पडणं पसंत केलं. भारतीय संघाने यापूर्वी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. या संघात शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठान आणि युसूफ पठान यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत.
हेही वाचा – KL Rahul : केएल राहुलचं चमकणार नशीब! कर्णधारपदासह मिळणार २५ कोटी, नेमकं कारण काय? जाणून घ्या
इंडिया चॅम्पियन्सचे चाहत्यांकडून कौतुक –
THE AURA OF SHAHID AFRIDI 👑
Lala single handedly owned India.
GOAT @SAfridiOfficial pic.twitter.com/B6XbHE5q7w
— Maham Gillani (@DheetAfridian) July 30, 2025
कर्णधार युवराज सिंगनेही भारतीय संघाच्या या निर्णयाला पाठिंबा देत इन्स्टाग्राम स्टोरीवर तिरंग्यासह एक निवेदन शेअर केलं. या कृतीतून भारतीय खेळाडूंनी शाहिद आफ्रिदीला सणसणीत प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येतं. भारतीय चॅम्पियन्सच्या या निर्णयाने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, चाहत्यांनी त्यांच्या देशभक्तीचं कौतुक केलं आहे.





