IND vs ENG : २१व्या शतकातील दुसरीच घटना: गिलचा नकोसा विक्रम, कोहलीच्या ‘या’ क्लबमध्ये झाला सामील

IND vs ENG 5th Test Shubman Gill Lost Toss : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, भारतीय कर्णधार शुबमन गिल या मालिकेत एकही नाणेफेक जिंकण्यात यशस्वी झाला नाही. यासह गिलने विराट कोहलीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
२१व्या शतकात दुसऱ्यांदा घडली ही घटना –
शुबमन गिलसाठी ही कसोटी मालिका कर्णधार म्हणून पहिला परदेश दौरा होता. फलंदाज म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले, पण कर्णधार म्हणून तो या पाच सामन्यांच्या मालिकेत एकही नाणेफेक जिंकू शकला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार केवळ १४ वेळा घडला आहे. २१व्या शतकात हा केवळ दुसरा प्रसंग आहे, जेव्हा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका संघाला एकही नाणेफेक जिंकता आली नाही.
Five tosses, all lost by Shubman Gill 🥲
India has now lost 15 consecutive tosses in international cricket 👀#ENGvIND #ShubmanGill #TeamIndia pic.twitter.com/QpEIfpmiOE
— Circle of Cricket (@circleofcricket) July 31, 2025
याआधी २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर एकही नाणेफेक जिंकू शकला नव्हता. गेल्या १३ कसोटी मालिकांमध्ये जेव्हा एखाद्या संघाने सर्व नाणेफेकी गमावल्या, तेव्हा तीन वेळा त्यांनी मालिका बरोबरीत सोडवली, तर एकदा १९५३ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका जिंकली होती.
हेही वाचा – KL Rahul : केएल राहुलचं चमकणार नशीब! कर्णधारपदासह मिळणार २५ कोटी, नेमकं कारण काय? जाणून घ्या
ओव्हलवर सातव्या कसोटीतही प्रथम गोलंदाजीचा निर्णय –
इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हल मैदानावर गेल्या सात कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजीच निवडली आहे. मे २०२३ पासून या मैदानावर खेळल्या गेलेल्या २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
द ओव्हल कसोटी ठरणार निर्णायक –
हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा निर्णाृयक सामना आहे. गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे, तर इंग्लंडला घरच्या मैदानावर विजय मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.





