Shah Rukh Khan: ‘अफोर्ड करू शकेल का?’ आर्यन खानसोबत काम करण्याबाबत शाहरुख खानचे उत्तर; ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या सिक्वेलवरही दिली प्रतिक्रिया

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान यांनी आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुलगा आर्यन खानसोबत काम करण्याबाबत दिलेले उत्तर सध्या चर्चेत आले आहे. २ नोव्हेंबर रोजी आपला ६० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या सेलिब्रेशनपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर #AskSRK नावाचा संवाद सत्र आयोजित केला होता.
या सत्रात त्यांनी चाहत्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना विनोदी व बुद्धिमत्तापूर्ण उत्तरं दिली. काही ट्रोल्सनी त्यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला, मात्र शाहरुखने त्यांनाही आपल्या उत्तरांनी गप्प केले. याच दरम्यान त्यांनी ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या प्रकल्पाच्या सिक्वेलबाबतही भाष्य केले.
आर्यन खानसोबत कामाबाबत काय म्हणाले शाहरुख?
या संवादादरम्यान एका युजरने विचारले, “आपण आपल्या मुलाला दिग्दर्शन करताना एखाद्या चित्रपटात पाहू शकता का?”
यावर शाहरुख हसत उत्तरले, “जर तो मला अफोर्ड करू शकला आणि माझे नखरे सहन करू शकला, तर नक्कीच!”
त्यांच्या या उत्तराने सोशल मीडियावर चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
If he can afford me!!! And my tantrums https://t.co/cNlBFPz4Vk
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’चा सिक्वेल येणार का?
एका युजरने शाहरुख खानला विचारले, “सर, आर्यन खानला सांगा की आम्हाला ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ चा सिक्वेल पाहायचा आहे.
यावर शाहरुख म्हणाले, “मुलांना काय करायचं हे समजावणं खूप अवघड असतं, पण मला खात्री आहे की तो या विषयावर काहीतरी करत असणार.”
It’s very difficult to tell your children what to do. But I am sure he will be working on it https://t.co/hK7pIkOag0
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
सुहाना खानसोबत काम करण्याबाबत प्रतिक्रिया
त्याच #AskSRK सत्रात एका चाहत्याने विचारले, “सुहाना खानसोबत ‘किंग’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव एका शब्दात सांगा.”
शाहरुखने उत्तर दिलं, “आपलंसं वाटतं.”
त्यांच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली.
Apna apna sa lagta hai…. https://t.co/BMGcEkoXXh
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
शाहरुख खानचा आगामी प्रवास
शाहरुख खान लवकरच दीपिका पदुकोणसोबत पुन्हा पडद्यावर दिसणार आहेत. ते ‘किंग’ या चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटाचा पोस्टर त्यांच्या वाढदिवशी प्रदर्शित केला जाणार आहे.
२०२३ हे वर्ष शाहरुखसाठी सुपरहिट ठरले होते. त्यांच्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तिन्ही चित्रपटांनी मिळून तब्बल २००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.





