मुंबई – अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा पठाण चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.सोशल मीडियावर शाहरुखच्या या नव्या चित्रपटाविरोधात काहींनी जणू मोहीमच सुरु केली आहे. चित्रपटातील गाण्यांवरून सुरु झालेला वाद चित्रपटाचे बंदीपर्यंत येऊन पोहचला आहे.अशात शाहरूखने आपल्या सोशल मीडियावरून थेट फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सुरुवात केल्याचे दिसून येते.
Ek mahine mein kitna kama lete hain? 🤪 #AskSRK
— Aman Ahmed (@Aman37730999) January 4, 2023
शाहरुखचे जेवढे विरोधक आहेत कदाचित त्याहून जास्त फॅन्स आहेत. अनेकदा शाहरुखला त्याचे चाहते विविध प्रश्न विचारताना दिसतात. अशा काही चाहत्यांना शाहरुखने आता भन्नाट उत्तरे दिल्याचे समजते. शाहरुखला एका चाहत्याने तू महिन्याला किती कमवतो ? असं विचारलं. त्यावर “प्रेम खूप कमावतो.. दररोज” असं उत्तर शाहरुखने दिल आहे.
The whole world is my family….family ke naam se naam nahi hota….kaam se naam hota hai. Choti baaton mein mat padho please. https://t.co/ctWPiUeUyO
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 4, 2023
दुसऱ्या चाहत्याने तर शाहरुखला कौटुंबिक प्रश्न विचारला तो म्हणतो,तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काश्मीरची मग तुम्ही नावात खान का लावता ? यावर शाहरुख लिहितो,”पूर्ण जगचं माझं कुटुंब आहे,कुटुंबाच्या नावाने नाव मोठं होत नाही…कमान होतं. किरकोळ गोष्टींमध्ये पडू नका. तर पठाण चित्रपट चांगला नाही,तू निवृत्ती घे असं म्हणणाऱ्याला शाहरुख म्हणतो,”मोठ्यांना असं बोलू नये. शाहरुखने केलेल्या या कमेंटवर चाहत्यांनी देखील आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. २५ जानेवारीला शाहरुखचा पठाण चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Beta badhon se aise baat nahi karte!! https://t.co/G5xPYBdUCK
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 4, 2023