मुंबई – शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. आता राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. राज्यातील राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता सर्वच पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याकडून पक्षांतर्गत बैठकाही सुरू आहेत.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे नेते आणि मुंबई विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी “कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत.
मांजरी बुद्रुक येथील पूल पाण्याखाली; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुत्रे आपल्या हाती घेतली असल्याचे बोलले जात आहे. तसेच आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. दर 20 दिवसांनी ते प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, कोणत्या वॉर्डात पक्षाचे प्राबल्य जास्त आहे, असे वॉर्ड निश्चित करून पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु