पुणे – जगद्विख्यात लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटला सात ते 11 वर्ष वयोगटातील मुलांवर करोना प्रतिबंधात्मक लसीच्या चाचणीसाठी भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली आहे. भारतातील 87 कोटी प्रौढ जनतेला यापुर्वी लस देण्यात आली आहे.
केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने सीरमला सात ते 11 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. सीरमने ऑस्ट्राझेन्का ऑक्सफर्डने विकसितत केलेल्या लसीची 12 ते 17 वयोगटातील मुलांवर यापुर्वीच चाचणी घेतली आहे. सुरवातीला ही चाचणी 100 जणांवर घेण्यात येऊन त्याचा सुरक्षितता अडवाल सादर केला आहे.
आतापर्यंत भारतात विकसित केलेल्या झायडस कॅडिलाच्या डीएनए कोविड19 लसीला भारतात वापरास आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे.