Rain Update : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज काय?
Rain Update : राज्यातील काही भागांत यंदा चांगला पाऊस झाला असला, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Rain Update : राज्यातील काही भागांत यंदा चांगला पाऊस झाला असला, तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या भागांमध्ये पावसाची तूट वाढत असून, सप्टेंबर महिन्यातही दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाकडून संकेत देण्यात आले आहेत. (Rain Update)
मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर २७ ऑगस्टपर्यंत मोठी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Rain Update)
या पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Update)
तसेच गरजेनुसार पिकांवरील कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोयाबीन पिकावर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Rain Update)
दरम्यान, विदर्भातील सध्याची पावसाची तूट २२ ते २५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्टअखेर ही तूट जवळपास ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उर्वरित ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस होण्याचा अंदाज आहे. (Rain Update)
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एल निनोचा प्रभाव कायम राहिल्यास सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर अपेक्षेप्रमाणे वाढण्याची शक्यता कमी आहे. बंगालच्या उपसागरात सध्या दमदार पाऊस आणणारे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नसल्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाची तूट निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन आणि पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Rain Update)
Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत; ऑरेंज अलर्ट केला जारी






