Rain Update : विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
Rain Update : विदर्भातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून विदर्भात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

Rain Update : विदर्भातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मॉन्सूनने पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Rain Update)
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर विदर्भात पावसाने अचानक विश्रांती घेतली होती. परिणामी दिवसा कडक ऊन आणि रात्री वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अनेक भागांत पुन्हा कुलर आणि पंख्यांचा वापर वाढला होता. मात्र, आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Rain Update)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Update)
दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. अमरावतीमध्ये कमाल तापमानात तब्बल ४.८ अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली असून तापमान २७.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. ब्रह्मपुरीसह इतर भागांतही तापमानात सुमारे चार अंशांची घसरण झाली आहे. (Rain Update)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाच्या पावसाळ्यावर एल-निनोचा प्रभाव असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Rain Update)
Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ! अनेक भागांत पूरसदृश स्थिती; जनजीवन विस्कळीत






