पुणे जिल्हा | महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी स्वप्नील तांबडे यांची निवड

मंचर, (प्रतिनिधी) – तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी स्वप्नील जालिंदर तांबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्वप्निल तांबडे यांची निवड झाल्याने तांबडेमळा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी राजाराम रणपिसे, सरपंच प्राजक्ता तांबडे, उपसरपंच मयूर भोर, ग्रामपंचायत सदस्य राजू तांबडे, सुदर्शन भोर, सुनंदा तांबडे, निकिता तांबडे, प्रतिभा भोर व माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र तांबडे व माणिक भोर, संतोष तांबडे, भानुदास तांबडे, सीताराम भोर, शंतनू तांबडे, किरण तांबडे, अक्षय तांबडे, नारायण भोर, संजय भोर, सचिन भोर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी स्वप्निल तांबडे म्हणाले की, गावातील तंटे गावातील जुनी जाणती मंडळी आणि गावातील पदाधिकारी तसेच तंटामुक्त समितीच्या पदाधिकारी आणि नागरिकांच्या साहाय्याने सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल.





