पुणे जिल्हा | राज्य कुस्ती स्पर्धेतील प्रावीण्यधारक कुस्तीगिरांना नोकरीमध्ये आरक्षण

मंचर, (प्रतिनिधी) – ग्रीकोरोमन व फ्री स्टाइल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त कुस्तीगिरांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण,दहावी व बारावी मध्ये वाढीव गुण व शासन मानधन मिळते.त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी केले.
कळंब (ता. आंबेगाव) येथे वीस वर्षांखालील ग्रीकोरोमन व फ्री स्टाइल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. ५ रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष सुरेश भोर,
तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, आंतरराष्ट्रीय पंच स्पर्धाप्रमुख दिनेश गुंड,आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष नितीन भालेराव,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे,पुणे जिल्हा अध्यक्ष मेघराज कटके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर स्पर्धेत एकूण ४२ जिल्ह्यातून ४२३ कुस्तीगीर खेळाडू ,२५ तांत्रिक अधिकारी पंच, पदाधिकारी,मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक असे मिळून एकूण ५५० जण सहभागी झाले आहेत.
ऑलम्पिक वीर मारुती आडकर, खजिनदार नवनाथ घुले,खेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव,जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ सदस्य विलास कदम,
आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष शांताराम काळे,सचिव जयवंत गाडे, माजी सरपंच राजश्री भालेराव,मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, ग्रामपंचायत सदस्या निर्मला थोरात,जयश्री भालेराव, गुलाबबाई कानडे,सोसायटी संचालक नितीन थोरात,
रूपाली भालेराव यांच्यासह आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघ सभासद,आजी-माजी पैलवान,आजी-माजी कबड्डी खेळाडू, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे संयोजन राजेंद्र पाबळे,शरद गाडे,युवराज मोढवे, नवनाथ भालेराव,जगन कोऱ्हाळे, युवासेना समन्वयक रोहन कानडे, शिवसेना शाखाप्रमुख हर्षल भालेराव, उपशाखाप्रमुख कुमार भोकसे,प्रमोद पिंगळे यांच्यासह सभासदांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी केले.





