Pune District: महिलेवर अत्याचार करणारा वकील ताब्यात
Updated On:

मंचर : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत वकिलाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, यामधील वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित महिला व वकील हे खेड तालुक्यातील असून यातील वकिलाने घोडेगाव पोलीस ठाण्याचा हद्दीत अत्याचार केले असल्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.





