ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. यावेळी दोघेही खूप आनंदी असल्याचे समजते. दोघांनी एकमेकांसोबत विविध पोज देत यावेळी फोटो काढले आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघाचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेकांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
\n\nविशेष म्हणजे, मराठमोळी अभिनेत्री सायली संजवनेही या नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सालीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. गेले अनेक महिने सायली संजीवचं नाव ऋतुराज गायकवाडशी जोडलं जात होतं. ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण सायलीने अनेकदा यावर भाष्य करत त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.
\nकोण आहे? उत्कर्षा पवार
\nउत्कर्षा पवारचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. ती एक क्रिकेटरही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती महाराष्ट्राकडून खेळायची. उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करते. ती 18 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघाकडून शेवटचा सामना खेळली होता. समोर आलेल्या माहितीनुसार उत्कर्षा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (पुणे) येथून शिक्षण घेत आहे.