Iqbal Durbar passed away : प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक आणि दरबार बँडचे संस्थापक संचालक इकबाल दरबार यांची निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुन्या पिढीतील नामांकित आणि ऑर्केस्ट्रा विश्वातील मोठं नाव म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्रात काही मोजक्या कलावंताच्या यादीत दरबार यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यांच्या सॅक्सोफोन वादनाने अवघ्या महाराष्ट्रावर गारुड निर्माण केले होते. त्यांचा हा प्रवास आता इथेच थांबला आहे. त्यांच्या वादनाने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही वेड लावले होते. इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतापुरते मर्यादित नव्हते. तर त्यांनी सामाजिक सलोखा जपत गरुजूंना मदतीचा हातही दिला होता. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. ते भोई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत होते. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असायची. दिलीप कुमार म्हणाले होते वन्स मोअर पुणे महानगरपालिकेतील एका कार्यक्रमात बॅालिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी त्यांच्या सॅक्सोफोनच्या सादरीकरणावर वन्स मोअरची दाद दिली होती. पुणे महापालिकेत आयोजित कार्यक्रमात नाच रे मोरा हे गीत इकबाल दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले होते. त्यावेळी अभिनेते दिलीप कुमार हे त्यांच्या सादरीकरणावर भारवून गेले होते. त्यांनी वन्स मोअर म्हणत त्यांना पुन्हा त्याच गाण्यावर सादरीकरण म्हणजेच सेक्सॅाफोन वादन करण्याची मागणी केली होती. हेही वाचा : “मी शांत आहे म्हणजे…”; घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना ऐश्वर्याने चांगलेच सुनावले