“मी शांत आहे म्हणजे…”; घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना ऐश्वर्याने चांगलेच सुनावले

Aishwarya Sharma | अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि अभिनेता नील भट्ट टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी आहे. ‘गुम है किसी के प्यार’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या या जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
इतकचं नाही तर ऐश्वर्या आणि नील एकमेकांना घटस्फोट देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने भलीमोठी पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे.
ऐश्वर्याची पोस्ट
ऐश्वर्या म्हणाली की, “मी आतापर्यंत बराच काळ शांत होते. यासाठी नाही की मी कमजोर आहे पण मला शांतता हवी आहे. पण काही लोक माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवत आहेत ज्याबद्दल मी काहीच बोलले नाही. त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. हे खूप त्रासदायक आहे. मी हे सुद्धा स्पष्ट करते, मी कोणतीही मुलाखत किंवा कोणत्याही ठिकाणी वक्तव्य केलेलं नाही.” Aishwarya Sharma |
“माझं आयुष्य हे तुमच्या मनोरंजनाचा भाग नाही. मी शांत आहे म्हणजेच कोणीही वाटेल ते बोलावं याची परवानगी मी कोणाला दिलेली नाही. कृपया माझ्या नावाचा चुकीचा वापर करणं बंद करा. जर तुमच्याकडे याचे कोणतेही पुरावे किंवा काही ऑडिओ किंवा व्हिडिओ असेल तर तो दाखवा. तसंच या सगळ्या अफवा पसवरणं थांबवा,” असं ऐश्वर्याने स्पष्ट केले आहे.
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी 30 नोव्हेंबर 2011 रोजी उज्जैन मध्ये लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्यानंतर या दोघांनी ‘बिग बॉस 17’मध्ये एकत्र भाग घेतला होता. Aishwarya Sharma |
हेही वाचा :






