Satara ZP Election – औंध जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळा हायटेक करण्यावर भर देणार आहोत. तसेच या भागातील वाड्या वस्त्यांवरील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, दळणवळण साधने अधिक सुलभ व्हावीत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी मला विजयी करून यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचा गड अभेद्य ठेवावा, आवाहन औंध जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनिषाताई फडतरे यांनी केले. यावेळी त्यांनी जनतेसाठी २४ तास कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.मनिषाताई फडतरे यांच्या पदयात्रा, गावोगावी भेटींना जोरदार प्रतिसाद मिळत मनिषाताई फडतरे यांनी जायगाव, भोसरे, वरुड, अंभेरी, कोकराळे आदी गावांतील भेटी दरम्यान नागरिक, महिलांना दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी औंध गणाचे उमेदवार शुभम शिंदे, सि. कुरोली गणाचे उमेदवार मनोज देशमुख उपस्थित होते.मनिषाताई फडतरे यांनी घरोघरी जाऊन प्रचारावर तिन्ही उमेदवारांचा भर असून राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा पोहचवत जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे व भविष्यातील कामांचे व्हिजन पटवून देण्याचा प्रयत्न ही यावेळी केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मनिषाताई फडतरे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या स्वप्नातील औंधसह परिसरातील गावातील विकासकामे पूर्ण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या सहकार्याने औंध जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव , वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. औंध गटातील जनतेने निस्पृह भावनेने माझ्यासह दोन्ही गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे रहावे.या भागातील माय माऊली, जनतेने आजपर्यंत जो पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस, राणीसाहेब महाराज यांना दिला तो यापुढे ही असाच द्यावा व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन शुभम शिंदे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, महिला, युवकांनी सर्व उमेदवारांचे जोरदार स्वागत केले.