Satara ZP Election 2026 : बंडखोरी संपली, चित्र स्पष्ट; फलटण तालुक्यातील ८ गट आणि १६ गणांसाठी ४७ उमेदवार आखाड्यात; पाहा
Satara ZP Election 2026 :

Satara ZP Election 2026 – जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी फलटण तालुक्यात जिल्हा परिषद ८ गटांसाठी ६३ आणि १६ गणांसाठी ११४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. २७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे ८ गटांसाठीसाठी ३३ तर गणांमधील ६७ उमेदवारांनी माघारघेतली असून आता १६ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत.
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी ही माहिती दिली.८ गट आणि १६ गणांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) त्याचप्रमाणे भाजप – राष्ट्रवादी आघाडी यांनी उमेदवार उभे केले आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन विकास आघाडी, शिवसेना (उबाठा), अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार ही निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.
८ गटांपैकी तरडगाव, बरड, वाठार निंबाळकर, कोळकी, साखरवाडी आणि हिंगणगाव या ६ गटात भारतीय जनता पक्ष विडणी व गुणवरे या २ गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत तर शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाने सर्व ८ ही गटात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने वाठार निंबाळकर, हिंगणगाव, बरड, कोळकी या ४ गटात, बहुजन समाज पार्टीने गुणवरे, साखरवाडी, कोळकी, बरड या ४ गटात, वंचित बहुजन आघाडीने विडणी,
साखरवाडी, बरड या ३ गटात, अ. भा. राष्ट्रीय काँग्रेसने बरड गटातून, शिवसेना (उबाठा) वाठार निंबाळकर, हिंगणगाव, कोळकी या ३ गटात, आणि वाठार निंबाळकर आणि कोळकी २ गटात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहेत.१६ गणांपैकी भारतीय जनता पक्ष तरडगाव, पाडेगाव, विडणी, सस्तेवाडी, बरड, दुधेबावी, कोळकी, जाधववाडी (फ) वाठार निंबाळकर, सुरवडी, सासवड, हिंगणगाव या १२ गणात, राष्ट्रवादी काँग्रेस साखरवाडी, सांगवी, आसू आणि गुणवरे या ४ गण,
शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) तरडगाव, पाडेगाव, विडणी, सस्तेवाडी, बरड, दुधेबावी, कोळकी, जाधववाडी (फ), वाठार निंबाळकर, सुरवडी, सासवड, हिंगणगाव, साखरवाडी, सांगवी, आसू आणि गुणवरे हे १६ गण, राष्ट्रीय समाज पक्षाने तरडगाव, बरड, दुधेबावी, कोळकी, वाठार निंबाळकर, सुरवडी या ६ गणात, वंचित बहुजन आघाडीने पाडेगाव, सुरवडी या २ गणात, शिवसेना (उबाठा) पाडेगाव, गुणवरे, वाठार निंबाळकर, सुरवडी या ४ गणात,
अपक्ष जाधववाडी (फ) सस्तेवाडी आणि कोळकी या ३ गणात उमेदवार निवडणूक आखाड्यात राहिले आहेत.फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट असून या मधील चार गट अनुसूचित जाती साठी आरक्षित आहेत, तर दोन गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व एक कोळकी गट सर्वसाधारण तर हिंगणगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
यामध्ये खऱ्या अर्थाने लढत होईल ती कोळकी व हिंगणगाव गटात कोळकी गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे व माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून पंधराच दिवसात शिवसेना पक्षातून उमेदवारी मिळविली आहे.
तर या ठिकाणी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, व उबाठा गटातून अभिजित विजय कदम, बसपाकडून प्रेम मोरे, व अपक्ष राजेंद्रआप्पा चोरमले लढणार आहेत.हिंगणगाव गटात माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट व किरण निलेश नलावडे व उबाठा गटाच्या शीतल सचिन झणझणे, व रासपाच्या सुप्रिया लक्ष्मण सूळ यांच्यात होणार आहे त्यात खरी लढत सारिका अनपट विरुद्ध किरण नलावडे यांच्यात तुल्यबळ होणार आहे.






