satara news: ‘तुरुंगात टाकला तर तुला थर्ड लावेन!’ रामराजेंचा रणजितसिंहांना धमकीदार इशारा

फलटण- शनीला सुद्धा साडेसाती लावणारे लोक डॉक्टर युवतीच्या मृत्यूप्रकरणात माझ्यावर आरोप करण्यासाठी कुत्र्याचुत्र्यांना पुढ करताय, हिंमत असेल तर तुम्हीच माझे नाव घ्या, मग तुमचे 1985 पासूनचे सगळेच बाहेर काढतो. आता 77 व्या वर्षी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी जाईन. परंतु, एक लक्षात ठेवा आत बसूनसुद्धा तुम्हाला थड लावीन, असा दम भरीत आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.
रामराजे नाईक निंबाळकर जाहीर सभेत बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, मिलिंद नेवसे, नितीन भैय्या भोसले, किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. प्रगतीताई कापसे यांच्यासह फलटण शहरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह गट सोडून गेलेल्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तत्कालीन प्रांताधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपधीक्षक राहुल धस, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्या कारभारावर सडकून टीका केली.
फलटणमध्ये भाऊबीजेला घडलेली घटना अंत्यंत दुर्दैवी असून तब्बल बाराशे वर्षांच्या इतिहासामध्ये अस कधी घडलं नाही. त्या डॉक्टर युवतीवर आत्महत्येची वेळ का आली, माजी खासदार सांगत आहेत की माझ्यावर षडयंत्र केले जात आहे. पण तुम्ही काही केलं नाही तर तुम्ही एवढं का घाबरला आहात, असे रामराजे यांनी सुनावले. ‘‘त्या प्रल्हादने माझं नाव घेतले, आता तुम्हीच नाव घ्या की. कुत्र्यचित्र्याने नाव घेऊ नये, तुम्हीच घ्या की मग बघू. अरे, मी सभापती असताना एका कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामध्ये राजकीय लोकांना गोवू नका, तेव्हा तुम्ही गप्प बसला. पण आता तुम्हीच नाव घ्या की तुमच्याविरुद्ध मी पुरावे देतोय किंवा आरोप करायला सांगतोय हे सांगा अन् मग मी पण सांगतो 1985 पासून तुमचं सगळच काढतो,’’ असा हल्ला रामराजेंनी केला.
रामराजे म्हणाले, ‘‘आमच्या हजार नाही बारा हजार चुका झाल्या असतील. मात्र, असले लोक राजकारणात अजिबात येऊ देऊ नका, फलटण तालुक्यात चार कारखाने आहेत. मग तिथ का झाले नाहीत वाद, तुमच्याकडेच कसे झाले? बीड जिल्हा नाईक निंबाळकर यांची जहागिरी होती ते यांना माहिती नाही, ती डॉक्टर व्यवस्थेचा बळी आहे. एसआयटी नेमली त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. तत्कालीन उपअधीक्षक राहुल धस यांचीही चौकशी झाली पाहिजे, यांच्या सांगण्यावरुन तत्कालीन प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी वाळूत दीड कोटी रुपयांचा दंड केले , गटातून गेलेल्या लोकांची नावे घेऊन जीभ विटाळवून घ्यायची नाही, आता त्यांना कोणाची ओढणी मिळणार आहे ते काय माहित?’’ फलटण तालुक्याची खूप अब्रू गेली.
आता तालुक्यात नवीन इंडस्ट्री येईल का? फलटण व साखरवाडी या दोन्ही कारखान्यांत मुकादम येतील का, माझा दिगंबर आगवणे यांचा काहीही संबंध नाही. मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ बघितले अन् वाईट वाटल. यांच्या जन्मजात गुंडगिरी आहे, मी त्यांच्यावर टीका करतो अन् सिक्युरिटी त्यांना, शनी महाराजाला साडेसाती लावणारा माणूस आहे, घाबरणार नसाल तर माझ्याबरोबर या, गुडघ्यात नव्हे यांच्या घोट्यात मेंदू आहे, असा प्रहार त्यांनी रणजितसिंहावर केला.
फलटण शहरातील पाणीपुरवठा योजना, रस्ते, रिंग रोड त्याचबरोबर इतर सर्वच कोट्यवधीची विकासकामे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत, असे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले. संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण शहराचा विकास हाच ध्यास घेतला. त्यामुळे हा बदल दिसतोय. तीव्र दुष्काळातसुद्धा पिण्याचे पाणी मिळते, काहीच केलं नाही, असे विरोधक म्हणत आहेत. मात्र, दुप्पट लोकसंख्या झाली तरी पाणी कमी पडणार नाही, शैक्षणिक संस्था सुरू आहेत, रिटर्निंग वॉल बॉक्स पूल झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा आज दिमाखात उभी राहिली.
अनेक विकासकामे रद्द करण्यात आली, 60 कोटींची विकासकामे थांबविल्यामुळे माजी आमदार दीपक चव्हाण यांना न्यायालयात जावे लागले. फलटणमध्ये तीस वर्षे शांतता होती. गटातटाच राजकारण थांबविले, श्रीराम सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी पंधरा वर्षे गेली. आज तो पाच हजार गाळप करीत आहे तो लवकरच 10 हजारने गाळप करणार आहे. तीन लाख लिटर दूध उत्पादित होतेय. साखरवाडी कारखाना रामराजेंनी वाचविला. डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास व्यवस्थित व्हावा ही माफक अपेक्षा आहे.’’





