कोपर्डे हवेली :- यशवंतनगर (ता. कराड) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून एका तरुण जागीच ठार झाला. सह्याद्री कारखाना कार्यस्थळावरील वाहन तळावर रविवार (दि. 27 रोजी) सकाळी हा अपघात झाला.
अविनाश दिनकर जाधव (वय २२, रा. सुपने ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, यशवंतनगर येथील सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर ट्रॅक्टर तळात रविवारी सकाळी भाऊसाहेब गायकवाड (रा. जालना) यांच्या मालकीचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली (एमएच २१ बीव्ही १७६२) सापडून अविनाश जाधव याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पलायन केले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पिसाळ तपास करत आहेत.
Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या
मृतदेह त्याब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार दिल्याने काही काळ तणाव
कारखाना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अविनाशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत या घटनेची जबाबदारी घ्यावी, हा अपघात आहे का घातपात, याची चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित अटक करा, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात आली. यामुळे घटनास्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी तळबीड पोलीस ठाण्याच्या स.पो.नि जयश्री पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, माणिकराव पाटील यांनी भेट देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर तणाव निवळला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.