Satara election : साताऱ्यात भाजपने उघडलं विजयाचं खातं; आशा पंडित ठरल्या बिनविरोध नगरसेविका

प्रभात वृत्तसेवा
सातारा – नगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयी सुरुवात केली असून प्रभाग 20 अ मधून पक्षाच्या उमेदवार आशा किशोर पंडित बिनविरोध निवडून आल्या आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 17 रोजी झाली. निवडणूक कर्मचारी काल पहाटेपासून पाच वाजेपर्यंत अर्ज छाननीच्या कामात व्यस्त होते. प्रभाग 20 अ मधून आशा पंडित यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज वैध ठरला आणि कोणत्याही विरोधकाचा अर्ज नसल्यामुळे त्या बिनविरोध विजयी झाल्या.
निकाल लागण्यापूर्वीच खाते उघडत भाजपने साताऱ्यात पहिला विजय नोंदवला आहे. या यशानंतर प्रभागात कार्यकर्त्यांनी आशा पंडित यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल- ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या उत्साहात विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. भाजपच्या या बिनविरोध विजयामुळे साताऱ्यातील निवडणूक वातावरण अधिक रंगतदार झाले असून पुढील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे





