Sanju Samson Explain : संजू सॅमसनने का सोडली राजस्थानची साथ? ‘सीएसके’मध्ये प्रवेश करताच केला मोठा खुलासा; पाहा VIDEO
Sanju Samson explain : यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे संजू सॅमसन आता सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.

Sanju Samson explain why leaving rajasthan royals : आयपीएलच्या १९ व्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे संजू सॅमसन आता सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सची प्रदीर्घ काळ साथ सोडल्यानंतर संजूने स्पष्ट केले की, “मला वाटलं की राजस्थानसोबतचा माझा काळ आता पूर्ण झाला आहे, म्हणूनच मी हा निर्णय घेतला. आता मी मैदानावर उतरल्यावर भावनांना स्वतःवर वरचढ होऊ देणार नाही.”
धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यासाठी उत्सुक –
संजू सॅमसनसाठी यंदाचा हंगाम खास असणार आहे, कारण त्याला महान कर्णधार एमएस धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल बोलताना संजू म्हणाला, “मी धोनी भाईसोबत आधीच चर्चा केली आहे. त्यांच्याकडून नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते. दोन महिने त्यांच्या जवळ राहून क्रिकेटमधील बारकावे शिकण्याची ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे.”
पहिलेच आव्हान राजस्थान रॉयल्सचे!
VIDEO | Thiruvananthapuram, Kerala: “This is the first time I will play against Rajasthan Royals, but I don’t let emotions rule me on the field. I left Rajasthan Royals because I felt my time in the team was over. Even if we come up against them now, I will play my best cricket,”… pic.twitter.com/yhzyONME20
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2026
योगायोगाने, सीएसकेचा या हंगामातील पहिलाच सामना गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. संजू सॅमसन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांची अदलाबदल (Trade) झाली असून, जडेजा आता राजस्थानच्या जर्सीत दिसणार आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळताना संजू म्हणाला, “सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर नक्कीच काही भावूक क्षण असतील, कारण मी त्या खेळाडूंसोबत बराच काळ घालवला आहे. पण मैदानात मात्र मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करेन.”
चेन्नईच्या प्रेमाचा वर्षाव –
मूळचा केरळचा असलेला संजू सॅमसन चेन्नईच्या चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावून गेला आहे. “चेन्नईचे प्रेक्षक मला त्यांच्यातीलच एक मानतात, हे पाहून मी थक्क होतो. त्यांच्या या प्रेमाचा आदर राखत मी सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यासाठी माझे सर्वोत्तम योगदान देईन,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला.





