Sanjay Raut | Raj Thackeray – मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू असताना, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. गेल्या तीन दिवसांतील राऊत यांनी राज ठाकरेंची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून त्यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी शुक्रवारी सांगितले होते की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, मात्र अधिकृत घोषणा कधी होईल हे स्पष्ट नाही. अनिल परब यांनीही शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.