Anaya Bangar : ‘ते मला घाणेरडे फोटो पाठवायचे अन् गाडीत…’, संजय बांगरच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूबद्दल मोठा खुलासा

Anaya Bangar serious allegations on Indian cricketer : माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये समालोचन करत आहेत, पण दरम्यान त्यांची मुलगी अनायाने एका मुलाखतीदरम्यान असा आरोप केला आहे, जो खरोखरच धक्कादायक आहे. संजय बांगर यांची मुलगी अनाया आधी मुलगा होती, पण आता तिने तिचे जेंडर बदलले आहे. ती एका मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झाली आहे.
लंडनमध्ये बराच काळ राहिल्यानंतर, अनन्या बांगर आता भारतात परतली आहे आणि येथे येताच तिने एका मुलाखतीत स्फोटक आरोप केले आहेत. अनाया बांगर म्हणाली की, एक मोठा भारतीय क्रिकेटपटू तिच्याशी संबंध ठेवण्याबद्दल बोलायचा तर काही खेळाडू तिचे अश्लील फोटो पाठवायचे.
क्रिकेटपटू मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवायचे – अनाया बांगर
'लल्लनटॉप बैठकी' में इस बार हमारी मेहमान हैं सोशल मीडिया इंफ्लुएंसर अनाया बांगर. अनाया पहले आर्यन बांगर के नाम से जानी जाती थीं. इस इंटरव्यू में उन्होंने ट्रांस महिला के रूप में अपने अनुभव साझा किए. बिना कहे न्यूड तस्वीरें भेजने वाले खिलाड़ी और एक वरिष्ठ क्रिकेटर की डिमांड. अनाया… pic.twitter.com/c15j8R6IYN
— The Lallantop (@TheLallantop) April 17, 2025
अनन्या बांगरने लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘क्रिकेटपटू मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवायचे. ते म्हणायचे, गाडीत ये, आम्हाला तुझ्यासोबत शरीर संबंघ ठेवायचे आहेत. काही क्रिकेटपटू सर्वांसमोर मला शिवीगाळ करायचे आणि नंतर फोटो मागायचे. अनन्या बांगरने सांगितले की जेव्हा तिने तिचे जेंडर बदलले तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, आता तू क्रिकेट सोडावे, क्रिकेटमध्ये माझ्यासाठी जागा नाही.
हेही वाचा – Zaheer Khan : ‘तू माझं करिअर उध्वस्त केलंस…’, विराटवर संतापला होता झहीर खान, काय आहे प्रकरण?
अनाया बांगर क्रिकेटपटू म्हणून कोणासोबत खेळली आहे?
View this post on Instagram
अनाया बांगरने सांगितले की, ती आज आयपीएलमध्ये धमाल करणाऱ्या अनेक खेळाडूंसोबत खेळली आहे. अनायाने मुशीर खानसोबत अंडर १४ क्रिकेट खेळले आहे. तसेच सरफराझ खान आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत वयोगटातील क्रिकेट खेळली आहे. अनायाने सांगितले की, क्रिकेट खेळण्याच्या काळात तिला तिची ओळख लपवावी लागली. ती लोकांचा विचार करायची. अनायाच्या मते, तिचे वडील संजय बांगर हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असल्याने तिच्यावर दबाव होता.
हेही वाचा – MI vs SRH : ट्रॅव्हिस हेडने क्लासेनला मागे टाकत रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू
अनायाला याबद्दल वाटते वाईट –
अनाया बांगर म्हणाली की, महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना खेळण्याची परवानगी नाही, तरीही तिचे टेस्टोस्टेरॉन पातळी सामान्य मुलींइतकीच आहे. याबद्दल तिला दुःख आहे. अनायाला वाटते की तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी. अनायाने या मुलाखतीत असेही सांगितले की, जेव्हा ती ८-९ वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या वॉर्डरोबमधून तिच्या आईचे कपडे काढून घालायची. तिला नेहमीच वाटत असे की ती एक मुलगी आहे.





