Sangli News : देशभरातील एटीएम चोरीच्या रॅकेटचा सांगली पोलिसांकडून पर्दाफाश
Sangli News : देशभरातील विविध शहरांमध्ये थेट एटीएम (ATM) मशीनच उचलायच्या आणि लांबवायच्या अट्टल गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.

Sangli News : देशभरातील विविध ठिकाणांहून एटीएम मशीन चोरुन नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सांगलीवाडी येथील एटीएम मशीन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना राजस्थानमधील या टोळीचा छडा लागला. (Sangli News)
पोलिसांनी राजस्थानमधील दोघा सराईत एटीएम चोरट्यांना कर्नाटकातून अटक केली असून, त्यांच्या चौकशीत देशभरातील नऊ एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (Sangli News)
बहादुर प्रल्हादराम चौकीदार बावरी (रा. कुलियाना, जि. डिडवाना, राजस्थान) आणि गोपाल तेजाराम बावरी (रा. रावलिया वास, जि. नगौर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. तर अर्जुन प्रेमाराम मेखवाल (राजस्थान) परागंदा झाला. (Sangli News)
सांगलीवाडी येथील एटीएम मशीन चोरीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करताना पोलिसांनी संशयितांचा माग काढत त्यांना कर्नाटकातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संशयित आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी देशातील विविध ठिकाणी एटीएम मशीन चोरल्याचे स्पष्ट झाले. (Sangli News)
या टोळीने एटीएम चोरीसाठी राजस्थानमधून विशेष पिकअप वाहन आणल्याची माहितीही आहे. एटीएम मशीनबरोबरच त्यांनी दोन दुचाकी चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीचा गुन्हेगारी कारवायांचा आवाका मोठा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Sangli News)
दरम्यान, या टोळीने देशातील अन्य शहरांमध्येही अशाच प्रकारे एटीएम मशीन चोरी केल्या आहेत का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तपासातून या टोळीच्या आणखी गुन्हेगारी कारवायांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. (Sangli News)
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, सागर टिंगरे, दरीबा बंडगर, संदीप नलावडे, सतीश माने, महादेव नागणे, अमिरशा फकीर, संदीप गुरव, उदय माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Sangli News)
Sangli News : वाळवा तालुक्यातील पिके होरपळली; शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले अश्रू





