Sangli News : वाळवा तालुक्यातील पिके होरपळली; शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले अश्रू
रेठरे धरण, धुमाळवाडी, मरळनाथपूर, जांभूळवाडी, सुरूल, ओझर्डेसह संपूर्ण वाळवा तालुक्याच्या (Sangli News) पश्चिम भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून उन्हाच्या तडाख्याने, ऐन भरात आलेली भुईमूग, सोयाबीन, मका आणि ऊसाची पिके पाण्याविना वाळून चालली आहेत.

Sangli News : रेठरे धरण, धुमाळवाडी, मरळनाथपूर, जांभूळवाडी, सुरूल, ओझर्डेसह संपूर्ण वाळवा तालुक्याच्या (Sangli News) पश्चिम भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून उन्हाच्या तडाख्याने, ऐन भरात आलेली भुईमूग, सोयाबीन, मका आणि ऊसाची पिके पाण्याविना वाळून चालली आहेत. भरात आलेली पिके डोळ्यादेखत होरपळून जात असल्याने बळीराजाच्या समोर दुष्काळाचे चित्र दिसत असून, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत.
यंदा जून महिन्यात देखील पावसाने ओढ दिली होती, यावर्षी पाऊस पडतो की नाही अशी स्थिती निर्माण (Sangli News) झाली होती. परंतु, जुलै महिन्यात पाऊस पडल्याने पेरण्या झाल्या, जुलै ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडला. भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी पिके जोमात आली होती. विशेषतः भुईमूगाला शेंगा भरण्याचा आणि सोयाबीनला शेंगा लागण्याचा हा महत्त्वाचा काळ आहे.
याच काळात पावसाने खंड दिल्याने जमिनीतील ओलावा पूर्ण संपला आहे. तांबड्या माळरानावर असलेली सोयाबीन व भुईमुगाची पिके अक्षरशा होरपळून चालली आहेत. आकाशात ढग दिसत आहे. परंतु, पाऊस पडायला तयार नाही, वाळलेल्या पिकाकडे हाताशपणे पाहत, शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत चालले आहेत, दुष्काळाचे गडद संकट शेतकऱ्याच्या समोर दिसू लागले आहे.
रेठरे धरण, धुमाळवाडी, सुरूल, ओझर्डे परिसरात आठ दिवसात पाऊस नाही झाला तर हातातोंडाशी आलेला घास जाणार आहे. मशागत, पेरणी, भांगलण, औषध फवारणी, खते घालून हजारो रुपये खर्च केला, पीक देखील चांगले आले.
परंतु, पाऊसच (Sangli News) पडत नसल्याने आता पिके वाळून जाण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. रेठरे धरण परिसरातील होरपळून गेलेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.






