Sangli News : सांगली हादरली! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना!
Sangli News : सांगली शहरातून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sangli News : शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (Sangli News)
मृत तरुणाचे नाव चैतन्य सुहास तोरणे (वय २०, रा. टिंबर एरिया, सांगली) असे आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Sangli News)
हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, संशयितांचा शोध घेण्यासाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. (Sangli News)
Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती
घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांचे पथक, तसेच सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Sangli News)
या खून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, खुनामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. (Sangli News)
Sangli News : मिरजमध्ये पहाटेच्या सुमारास आगीचा भडका ! सुदैवाने जीवितहानी टळली
Sangli News : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सांगलीतील व्यावसायिकाला 2 कोटी 55 लाखांना गंडा






