Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे (Sangli News) पडघम वाजताच नोकर भरतीला तातडीने स्थगिती देण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दि. 22 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया जुलै महिन्यापासूनच सुरू करण्यात येणार आहे.

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे (Sangli News) पडघम वाजताच नोकर भरतीला तातडीने स्थगिती देण्यात आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दि. 22 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया जुलै महिन्यापासूनच सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे बँकेमार्फत सेवक भरती प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य होणार नाही, जिल्हा बँकेची निवडणूक (Sangli News) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेची नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी असे आदेश शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था) यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीवरुन (Sangli News) चांगलंच राजकारण तापलं होतं. नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शद पवार पक्षाकडून या नोकर भरतीवरून जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून नोकर भरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे संचालक मंडळामध्ये खळबळ उडाली आहे.






