Samsung OLED Cling Band : सॅमसंगने मोबाईल वर्ल्डच्या पहिल्या दिवशी जागतिक स्तरावर गॅलेक्सी रिंग सादर केली आहे. ही स्मार्ट रिंग वर्षअखेरीस विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय सॅमसंगने या मेगा टेक इव्हेंटमध्ये वेगळ्या प्रकारचा फोल्डेबल स्मार्टफोन प्रदर्शित केला आहे. सॅमसंगचा हा फोल्डेबल स्मार्टफोन तुम्ही फोल्ड करून तुमच्या मनगटावर घालू शकता. यापूर्वी, मोटोरोलाने या वेळी MWC 2024 मध्ये अशाच फोल्डेबल स्मार्टफोनची झलक दाखवली आहे.अशात हा फ्लेक्सिबल फोन खूपच चर्चेत आला आहे. | Samsung Phone Update
ब्रेसलेटप्रमाणे घालू शकता तुम्ही फोन
सॅमसंगने या फोल्डेबल कॉन्सेप्ट फोनला OLED Cling Band असे नाव दिले आहे. मोटोरोलाच्या बँडेबल स्मार्टफोनप्रमाणे हा फोन ‘यू’ आकारात फोल्ड करून मनगटावर घालता येतो. याच्या मागील बाजूस फॅब्रिक मटेरियल वापरण्यात आले आहे, ज्यामुळे बॅक पॅनल सहज वाकू शकतो. या स्मार्टफोनमध्ये फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले पॅनलचा वापर करण्यात आला आहे. | Samsung OLED Cling Band
या फोनच्या मागील बाजूस सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची जाडी खूपच स्लिम आहे आणि तो बेझल-लेस डिस्प्ले पॅनेलसह येतो. मात्र, सॅमसंगचा हा स्लिंग फोन सध्या उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आगामी काळात हे फॅशनेबल उत्पादन ठरू शकते. सॅमसंगच्या फ्लिप आणि फोल्ड स्मार्टफोन्सप्रमाणे या फोनच्या डिस्प्लेबाबतही अनेकांच्या मनात शंका आहेत.कारण पूर्णपणे घडी घातल्याप्रमाणे वापरता येणारा हा फोन आहे. | Samsung OLED Cling Band
मोटोरोला आणि सॅमसंगचे हे बेंड करण्यायोग्य फोन बाजारात कधी उपलब्ध होतील याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, परंतु हे स्पष्ट आहे की दक्षिण कोरियाची कंपनी आगामी काळात फोल्डेबल डिव्हाइसची किंग राहील. या रिस्ट फोन व्यतिरिक्त, कंपनीने MWC 2024 मध्ये लवचिक डिस्प्लेसह एक स्पीकर देखील लॉंच केला आहे. हा स्पीकर स्मार्टवॉचवरूनही नियंत्रित करता येतो.| Samsung OLED Cling Band