Pune News : नवनाथ वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा समाजाची पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी
Pune News : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

Pune News : मराठा समाजातील महिला व मुलींबाबत अवमानकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. (Pune News)
वाघमारे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना मराठा समाजातील महिला व मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. (Pune News)
भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ, ऑडिओ आणि सोशल मीडिया पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. (Pune News)
वक्तव्य पुण्यात केल्याने पुण्यातच गुन्हा दाखल करावा. अन्यथा नवनाथ वाघमारे यांना पुणे बंदी करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाने निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती संघटनेच्यावतीने राजेंद्र कुंजीर यांनी दिली. (Pune News)





