IND vs WI : साई सुदर्शनच्या डेअरिंगला सलाम! चेंडू एवढ्या जोरात लागला तरी सोडला नाही कॅच, पाहा VIDEO

Sai Sudharsan Catch Video Viral : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 5 बाद 518 धावांचा डोंगर उभारत डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल (175) आणि शुबमन गिल (129) यांच्या शानदार शतकी खेळींसह साई सुदर्शन (87), नितीश कुमार रेड्डी (43) आणि ध्रुव जुरेल (44) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. केएल राहुलने 38 धावा जोडल्या. यानंतर क्षेत्ररणातही साई सुदर्शनने महत्त्वपूर्ण योगदान देत नेत्रदिपक झेल घेतला आणि सर्वांचे लक्ष वेधलं.
साई सुदर्शनचा अविश्वसनीय झेल –
भारताने आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजने सावध फलंदाजीला सुरुवात केली. रवींद्र जडेजाच्या आठव्या षटकात साई सुदर्शनने फॉरवर्ड शॉर्ट लेगवर उभा राहून चमत्कारी झेल टिपला. जॉन कॅम्पबेलने स्वीप शॉट खेळला, परंतु चेंडू साईच्या छातीत, डाव्या हातावर आणि हेल्मेटवर जोरदार आदळला. विशेष त्याने वेदनेने कळवळत असतानाही चेंडू सोडला नाही आणि हा अविश्वसनीय झेल पूर्ण केला. कॅम्पबेलसह सर्वचजण थक्क झाले. या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
What a grab by Sai Sudharsan! Unbelievable 🤯
Sunil Gavaskar in the commentary background: ‘He caught it, he caught iitttt!pic.twitter.com/7cVpUn48mo
— GillTheWill (@GillTheWill77) October 11, 2025
झेल घेतल्यानंतर साईच्या हाताला दुखापत झाल्याने तो काही वेळासाठी मैदानाबाहेर गेला. रिप्लेमध्ये चेंडूचा जोरदार फटका स्पष्ट दिसला. दरम्यान, ध्रुव जुरेलने उत्साहात विकेटचे सेलिब्रेशन सुरू केले, परंतु कर्णधार शुबमन गिलने त्याला थांबवत साईकडे लक्ष दिले. फिजिओसह साई मैदानाबाहेर गेला. या झेलमुळे जडेजाला सामन्यातील पहिली विकेट मिळाली आणि भारताला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळाला.
Sai sudarshan caught an outstanding catch 🔥☠️#SaiSudharsan #BCCI #INDvsWI #TestCricket #ViratKohli #cricketfans #gautamgambhir pic.twitter.com/2fJRb8rAqy
— itzsecondself (@itzsecondself) October 11, 2025
पहिल्या डावात भारताची मजबूत पकड –
भारताच्या टॉप ऑर्डरने उत्कृष्ट फलंदाजी करत सामन्यावर वर्चस्व मिळवले. जैस्वाल आणि गिल यांच्या शतकांनी, तसेच सुदर्शन, रेड्डी आणि जुरेल यांच्या योगदानाने भारताने वेस्ट इंडिजवर दडपण टाकले आहे. साईच्या चकित करणाऱ्या झेलमुळे भारताने गोलंदाजीतही आघाडी घेतली आहे. सामना पुढे कसा रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





