IND vs PAK : दोन जीवनदान, अर्धशतक, अन् फायरिंग सेलिब्रेशन साहिबजादाला शिवमने दाखवला तंबूचा रस्ता! पाहा VIDEO

IND vs PAK Sahibzada Farhan Gun Firing Video : आशिया कप 2025 च्या सुपर फोर फेरीतील भारत-पाक सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने 58 धावांची शानदार खेळी केली, परंतु अर्धशतकानंतर त्याने केलेल्या ‘फायरिंग सेलिब्रेशन’मुळे तो वादाच्या केंद्रस्थानी आला. साहिबजादाने अर्धशतकानंतर आपले बॅट उलटी धरून बंदुकीसारखे सेलिब्रेशन केले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्याला तंबूतचा रस्ता दाखवला.
शिवम दुबेचे साहिबजादाला चोख प्रत्युत्तर –
साहिबजादा फरहानने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतरच्या 11 चेंडूंवर त्याला एकही चौकार मारता आला नाही. यानंतर शिवम दुबेने आपल्या उत्कृष्ट स्लोअर चेंडूवर साहिबजादाला बाद केले. साहिबजादाने लांब षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॅट हातातून निसटले आणि कव्हर्सवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवने सहज झेल घेतला.
Sahibzada Farhan hunting Rafale and Indian cricket team. pic.twitter.com/Qdo0RrZYWa
— Azlan (@azlanxz) September 21, 2025
Shivam Dube 2 Wicket 🔥
After two dropped catches, Shivam Dube made a brilliant comeback and took two crucial wickets.
What a Player 🔥 #INDvPAK #shivamdube pic.twitter.com/W8F5QpePkU
— D.S. Bhati (@DSCricinfo789) September 21, 2025
दोन जीवनदानामुळे फरहानने झळकावले अर्धशतक –
A rare sight — Team India dropped too many catches in the field, which helped Pakistan post a 170+ total! 🇮🇳👀🙆♂️#AbhishekSharma #KuldeepYadav #India #Sportskeeda pic.twitter.com/sL7V25CwkP
— Sportskeeda (@Sportskeeda) September 21, 2025
साहिबजादा फरहानला अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी दोनदा जीवनदान मिळाले होते. विशेष म्हणजे दोन्ही जीवनदान अभिषेक शर्माने त्याचे दोन झेल सोडल्यामुळे मिळाले होते. पहिला झेल सामन्याच्या पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याच्या चेंडूवर साहिबजादा शून्य धावांवर असताना सोडला, तर दुसरा झेल वरुण चक्रवर्तीच्या षटकात सुटला होता.
हेही वाचा – IND vs PAK : अभिषेक-कुलदीपसह गिलने भारतीय फिल्डींगची काढली लाज! एक-दोन नव्हे तब्बल चार कॅच सोडले
शिवम दुबेची शानदार गोलंदाजी –
या सामन्यात शिवम दुबेने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. ज्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहसारखा दिग्गज गोलंदाज अपयशी ठरला, तिथे शिवमने 4 षटकांत 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने साहिबजादा फरहान व्यतिरिक्त सैम अय्यूबलाही तंबूत पाठवण्याचे काम केले. हा सामना आणि साहिबजादाच्या वादग्रस्त सेलिब्रेशन सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.





